
मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन
शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय अहील्यानगर दि.२० प्रतिनिधी मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी विभागाच्या अधिकार्याना दिल्या आहेत. सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आ. मोनिकाताई राजळे, आ.विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात








