- कोल्हार (वार्ताहर) —
पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीदेवी मंदिरात एक साधा, पण मनाला स्पर्श करणारा शिधावाटप उपक्रम राबवण्यात आला.
समाजातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने
कोल्हार बु. व भगवतीपूर ग्रामपंचायतीतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुजय विखे पाटील एकनिष्ठ ग्रुप तर्फे करण्यात आले.
दैनिक घाण, दूषित वातावरण आणि कष्टप्रद परिस्थितीत समाजासाठी स्वच्छता राखण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या
सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.कार्यक्रमास कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे,संजय कोळसे, पंढरीनाथ खर्डे, भगवान राऊत, गोरक्षनाथ खर्डे,संभाजी देवकर, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे वसतराव मोरे, राजेंद्र राऊत, केतन लोळगे, श्रीकांत बेद्रे, विनोद गुगळे,दिलीप शेळके, संतोष लोखंडे, प्रवीण बेंद्रे, संतोष टेकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की,“समाजाच्या स्वच्छतेची जबाबदारी पेलणारे हात हेच गावाच्या आरोग्याचे आधारस्तंभ आहेत.
दादांच्या वाढदिवसाचा साजरा हा फक्त औपचारिक नसून, समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाबद्दल उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांनीही या सन्मानाने आपापल्या भावना व्यक्त करत
समाजाने मान्यता दिली की कष्टाचे ओझे हलके वाटते, असे सांगितले.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेत
दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा तयार झाली असून,
त्यांचा वाढदिवस हा उत्सवापेक्षा सेवेला वाहिलेला दिवस बनला आहे.
या उपक्रमामुळे कोल्हार आणि भगवतीपूर परिसरात समाजिक सलोखा, संवेदनशीलता आणि कृतज्ञतेची भावना
दृढ होत असल्याचे उपस्थितांच्या प्रतिक्रिया दर्शवतात.












