प्रवरा नगरी वार्ता कोल्हार बु (राहाता)
कोल्हार भगवतीपूर – दिवाळीपर्वाचे औचित्य साधत सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोन्याची निवड ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. स्थानिक सराफ दालनां मध्ये सुवर्णपिढ्यांच्या पारंपरिक विश्वासामुळे महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. कोल्हारच्या सोन्याला वाढती मागणी मिळत असून गावातील सुवर्णव्यवसायाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
सराफ व्यवसायातील चौथ्या पिढीचे यशस्वी पदार्पण – विश्वास आणि प्रामाणिकतेची परंपरा कायम
कोल्हार-भगवतीपूर परिसरात दसरा-दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या खरेदीत उल्लेखनीय उत्साह पाहायला मिळत आहे. विश्वास, गुणवत्ता आणि प्रामाणिक व्यवहार या मूल्यांवर घडलेली लोळगे कुटुंबाची सराफ व्यवसायातील पारंपरिक परंपरा आता चौथ्या पिढीत प्रवेश करत असून, ग्राहकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.

वैभव & वैष्णवी ज्वेलर्स, कोल्हार बु. हे या परंपरेचे नवे दालन सुरू करत केतन रवींद्र लोळगे आपल्या कुटुंबीयांची विश्वासू ओळख पुढे नेत आहेत. पारदर्शक व्यवहार, उत्कृष्ट डिझाईन, हॉलमार्क दागिने आणि योग्य दर यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विशेष विश्वास आहे.
स्थानिक ग्राहकांसोबतच परिसरातील लोकांचाही सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी वैभव & वैष्णवी ज्वेलर्सकडे कल वाढताना दिसत आहे. “विश्वास हीच आमची ओळख आणि प्रामाणिक व्यवहार हीच आमची परंपरा,” असे केतन लोळगे यांनी सांगितले.

तिन्ही पिढ्यांचा सुवर्णविश्वास – बार्शीकर ज्वेलर्सला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद
स्थापनेपासून गेली 30 वर्षे गुणवत्तेची आणि विश्वासाची परंपरा जपणाऱ्या बार्शीकर ज्वेलर्स या प्रतिष्ठानावर आजही ग्राहकांचा तितकाच विश्वास कायम आहे. सोन्याचा दर वाढत असला तरी “सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक” म्हणून ग्राहक अजूनही सोन्यालाच प्राधान्य देत आहेत, असे बार्शीकर ज्वेलर्सचे मालक जीवनराव बार्शीकर यांनी सांगितले.
हॉलमार्क प्रमाणित सोन्याचे दागिने, पारदर्शक व्यवहार आणि विश्वास हीच आमची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आमच्या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विक्री नव्हे तर विश्वासाचे नाते जपणे. आमचे ग्राहक हे तीन पिढ्यांपासून आमच्याशी जोडले गेले आहेत. प्रामाणिकता, व्यवहारातील सुसंवाद आणि ग्राहक समाधान हीच आमची सेवा आहे,” असे जीवनराव बार्शीकर यांनी सांगितले.
दिवाळीनिमित्त सोन्या-चांदीच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली असून ग्रामीण भागातूनही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. “गुणवत्ता आणि प्रामाणिकता हाच आमचा वारसा – आणि तो आम्ही पुढेही कायम ठेवणार आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जीवनराव बार्शीकर बार्शीकर ज्वेलर्स, कोल्हार बु“

दिवाळीत सोन्या–चांदीच्या खरेदीला उत्साह देडगांवकर ज्वेलर्सची पहिली पसंती
कोल्हार बु – 33 वर्षांचा सोनेरी विश्वास जपणाऱ्या देडगांवकर ज्वेलर्स येथे दिवाळीनिमित्त सोन्या–चांदीच्या खरेदीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
✅ सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट
✅ चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट
✅ हॉलमार्क/HUID प्रमाणित दागिने
✅ प्रवरा परिसरातील पहिली सुवर्णपिढी
विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शक व्यवहारामुळे ग्राहकांची पहिली पसंती – देडगांवकर ज्वेलर्स, कोल्हार बु
रोहित देडगांवकर

सालाबादप्रमाणे यंदाही दीपावलीचा उत्साह ग्रामीण भागात दिसून येत असून खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनेखरेदीकडे ग्राहकांचा विशेष कल वाढलेला दिसत आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत सुरक्षित बचत, भविष्याची हमी आणि बाजारमूल्य वाढीचा अखंड परतावा यामुळे सोने हे ग्राहकांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.
सोनेबरोबरच चांदीही गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम म्हणून लोकप्रिय ठरत असून सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय कुटुंबांपर्यंत लहान ते मोठ्या रकमेत चांदीची खरेदी वाढली आहे. नाणी, बिस्किटे, पैंढरी, तसेच दागिन्यांच्या स्वरूपात सोन्या-चांदीची खरेदी जोमात सुरू आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विश्वसनीय आणि फायदेशीर परतावा देणारे साधन म्हणून सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल स्पष्ट दिसत आहे.
दीपावलीच्या खरेदीबाबत बोलताना स्वरूपा ज्वेलर्स, कोल्हार चे संचालक डॉ. श्रीकांत बेद्रे म्हणाले की,
“गुंतवणूक करताना ग्राहक आता अधिक जागरूक झाले आहेत. बँकिंग परताव्यापेक्षा चांगला परतावा देणारे आणि सुरक्षित राहणारे साधन म्हणून सोने आणि चांदीची निवड होत आहे. ग्रामीण भागातही आर्थिक नियोजनाची जाण वाढत असून सोन्या-चांदीवरील गुंतवणूक सातत्याने वाढते आहे.
श्रीकांत बेंद्रे स्वरूपा ज्वेलर्स – कोल्हार
संपर्क: 7385878990
