कोल्हार-भगवतीपूर 
प्रवरा नगरी वार्ता
कोल्हार-भगवतीपूर (वार्ताहर):
युवा नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील मित्र मंडळाच्या वतीने डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हार-भगवतीपूर परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वतः डॉ. सुजय विखे पाटील हस्ते करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी छायादायी, फळझाडे आणि पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली.
भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुंदर वातावरण तयार करणे
पर्यावरण रक्षणाबाबत जागृती करणेअसा असल्याचे डॉ. सुजयदादांनी सांगितले.ते म्हणाले, “वृक्ष हेच खरे संपत्ती आहेत. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे.”
ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रामस्थांनीही उत्साहाने झाडे लावून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमात मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगत गावातील युवकांना अशा उपक्रमात सातत्याने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या वृक्षारोपणामुळे गावातील हरित विकासाला चालना मिळेल आणि भावी काळात अजून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची तयारी मित्र मंडळाने व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानत पुढेही वृक्षसंवर्धनासाठी काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी उद्योजक नितीन कुंकुलोळ,विखे पाटील कारखान्याचे संचालक श्रीकांत खर्डे,स्वप्नील निबे,पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे सदस्य ऋषिकेश खांदे,
भगवतीपूर सरपंच दत्तात्रय राजभोज,गोरख खर्डे,भरत खर्डे, पंढरीनाथ खर्डे, धनंजय दळे, प्रवरा बँकेचे संचालक राजेंद्र राऊत, शामराव गोसावी, संतोष टेकाडे, ज्ञानदेव शेळके, गोपीनाथ निबे, केतन लोळगे, श्रीकांत बेंद्रे,शरद खर्डे, साईनाथ खर्डे, संतोष लोखंडे,वसीम पिंजारी
तसेच डॉ. सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.












