कोल्हार (प्रतिनिधी)
नगर दक्षिणचे मा. खासदार, युवकांचे प्रेरणास्थान आणि पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हार भगवतीपुर येथील भगवतीमाता विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन एकनिष्ठ ग्रुप व डॉ सुजय दादा विखे पाटील युवा मंच, कोल्हार-भगवतीपुर यांच्या वतीने करण्यात आले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व विभागातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली.
कार्यक्रमाचे संयोजन करताना डॉ सुजयदादांच्या सामाजिक कार्याची परंपरा जपत “विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी” हा सकारात्मक संदेश देण्यात आला यावेळी . सयाजी रघुनाथ खर्डे पाटील (अध्यक्ष,भगवतीमाता देवालय ट्रस्ट). संभाजीराजे देवकर पाटील (अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटी).वसंतराव मोरे पाटील ,. पंढरीनाथ खर्डे पाटील, उपसरपंच श्री. प्रकाशराव खर्डे पाटील सरपंच . दत्तात्रय राजभोजश्री. विनोद गुगळे, .अक्षय मोरे पाटील दिलीप शेळके भगवान राऊत. श्रीकांत बेद्रे सर सूर्यभान कापसे पाटीलश्री. केतन लोळगे राजुभाई शेख प्राचार्य डॉ. आहेर सर मुख्याध्यापिका अडेप मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते












