कोल्हारमध्ये संविधान सन्मान कार्यक्रम उत्साहात; विविध संघटना व मान्यवरांची उपस्थिती

कोल्हार भगवतीपुर (ता.राहाता)
कोल्हार भगवती परिसरात संविधान सन्मान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संविधानाचा जागरूकतेने सन्मान व्हावा, नागरिकांनी आपल्या हक्क–कर्तव्यांची जाण ठेवावी आणि संविधान मूल्यांचा प्रसार गावापासून शाळा–महाविद्यालयांपर्यंत व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिका वाचनाने झाली. लवलेश लोखंडे यांनी उद्देशिका वाचन करून उपस्थितांना संविधान मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

यावेळी सुत्रसंचलन करतांना प्रवीण लोखंडे यांनी संविधान दिन केवळ औपचारिक न करता, गावपातळीवर तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान दिंडी काढून सामूहिकरीत्या साजरा करण्याची गरज व्यक्त केली.

हर्षद बर्डे (सत्यशोधक क्रांतिकारक लहुजी सेना) यांनी आपल्या भाषणात सामाजिक जागृतीवर भर देत, “लोकांना दिवाळी बोनस घ्यायला चालतो; पण बोनस ज्या महामानवामुळे   मिळतो, त्यांचा मान ठेवायला तयार नसतात,” अशी मार्मिक टीका केली.

यानंतर विविध संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी संविधान मूल्यांचे महत्त्व प्रतिपादन करत आपली मते मांडली.

कार्यक्रमाचे आयोजन
आर.पी.आय. (आठवले गट), भिम शक्ती मित्र मंडळ, बहुजन हक्क अभियान, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, समता जनविकास समिती, एकलव्य तरुण मंडळ, संत कैकाडी महाराज तरुण मंडळ – कोल्हार
या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमातील मान्यवर उपस्थिती
कोल्हार भगवती ग्रामपंचायत
सरपंच – दत्तू राजभोज
उपसरपंच – प्रकाश खर्डे

कोल्हाळेश्वर ग्रामीण पतसंस्था चेअरमन भरत खडे पाटील

पा. संभाजीराव देवकर
ग्रामसेवक – शशिकांत चौरे
सदस्य – संतोष लोखंडे, तबाजी लोखंडे, चंद्रकांत लोखंडे, जालिंदर थोरात, विष्णू माळी, भाऊसाहेब माळी आर.पी.आय.लवलेश लोखंडे, प्रविण लोखंडे, स्वप्नील लोखंडे

सत्यशोधक क्रांतिकारक लहुजी सेना
सुनिल बोरूडे, हर्षद बर्डे, कामेश बोरुडे
समता जनविकास समिती
राजू बर्डे, बाळासाहेब गायकवाड, कॉ. सुरेश पानसरे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम चक्रे, बंटी लोखंडे, सुजल दिवे, गौरव लोखंडे, प्रतिक गायकवाड, आशू लोखंडे, वैभव लोखंडे, सत्यजित भोसले, प्रवीण लोखंडे, प्रतिक धेंडे, साहिल लोखंडे, नौशाद पठाण यांनी नियोजन केले.

यावेळी अनूप लोखंडे, चंदू लोखंडे, सनी लोखंडे, शाम लोखंडे, जॉनी लोखंडे, सचिन लोखंडे, संभाजी लोखंडे, सुरेश लोखंडे, प्रविण लोखंडे, प्रतिक लोखंडे, अक्षय लोखंडे, निखिल लोखंडे
तसेचवनिता लोखंडे, वृषाली लोखंडे, सुनिता लोखंडे, मनिषा लोखंडे
यांची उपस्थिती होती.

Leave a Comment