सकल आदिवासी समाजाच्या वतीने लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन

लोणी (राहता)
सरोळे पठार (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी आदिवासी महिला ज्योती ढवळे यांना पाणी भरण्याच्या कारणावरून अमानुष मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आले. घटनेला सात दिवस उलटूनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आज सकल आदिवासी समाज, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, एकलव्य संघटना आणि आदिवासी वादळ यांच्या वतीने लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या निवेदनात उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी, कठोर कारवाई करावी तसेच पीडितेच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन स्विकारताना पोलीस प्रशासनास समाजाच्या भावना तसेच पीडितेला न्याय मिळावा यासाठी त्वरीत योग्य कृती करावी असा इशाराही देण्यात आला. आरोपींपैकी काहींना अटक झाली असली तरी इतर आरोपी अजूनही फरार आहेत. पोलीस शोध घेत असून तातडीने आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेपुढे आणण्याची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली.

या प्रसंगी समाजातील पदाधिकारी विशाल वाघ, हर्षद बर्डे ,व कामेश बोरुडे यांनी मनोगत व्यक्त करत अन्याय सहन केला जाणार नाही, आदिवासी समाजावरील अत्याचाराविरोधात संघर्ष सुरूच राहील असा संदेश दिला.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा अध्यक्ष विशाल वाघ, गणेश गवळी, संतोष पवार, गणेश मोरे, हर्षद बर्डे, एकलव्य संघटनेचे अनिल रोकडे, आदिवासी वादळ ग्रुपचे प्रशांत बर्डे, एकलव्य प्रतिष्ठानचे भारत जाधव, तुषार बर्डे, विशाल बर्डे, सौरभ बर्डे, आकाश बर्डे, गणेश बर्डे, वैभव माळी, राहुल जाधव, आदित्य माळी, विशाल पवार, कामेश बोरुडे, सुनिल शेलार, पवन बोरुडे व इतर समाज बांधव उपस्थित होते

Leave a Comment