दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत – मंत्री विखे पाटील”

प्रवरा नगरी वार्ता

जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांना ८४६ कोटींची मदत

अहिल्यानगर – सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या निसर्गविपत्तीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर शेतीच्या जमिनीवर पिकांचे नुकसान झाले.

शासकीय पाहणी आणि पंचनाम्यानंतर प्रशासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांसाठी ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. दिवाळीपूर्वी या मदतीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे जलसंपदा व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, मदत निधी वर्ग करताना शासनाचे नियम, नैसर्गिक आपत्ती संबंधित अटी व निकषांचे पालन केले जाईल. लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

Leave a Comment