प्रवरा नगरी वार्ता -कोल्हार (राहाता)
कोल्हार भगवतीपूर – गावातील बाजारपेठेला ऊर्जितावस्था मिळावी, स्थानिक व्यापार वाढावा आणि गाव आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावे या उद्देशाने कोल्हार भगवतीपूर येथील तरुण अक्षय मोरे यांनी एक अनोखी सामाजिक संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा लोकहितासाठी उपयोग कसा करता येतो याचे कौतुकास्पद उदाहरण अक्षय मोरे यांनी घालून दिले आहे.
अक्षय मोरे यांनी गावातील सर्व दुकानदारांची माहिती संकलित करून आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटस वर स्थानिक व्यावसायिकांची मोफत डिजिटल जाहिरात सुरू केली आहे. यात गावातील किराणा दुकाने, हार्डवेअर, कपड्यांची दुकाने, मेडिकल, शेतीसाहित्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, मोटारगेरेज, ब्युटीपार्लर इत्यादी सर्व व्यवसायिकांची माहिती प्रकाशित केली जाते. यात दुकानांचे फोटो, उपलब्ध वस्तू, ठिकाणाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक यांचा समावेश असतो.
“मोठ्या शहरांसारखी डिजिटल प्रगती आपल्या गावातही व्हायला हवी. बाहेरगावातील लोकांनी कोल्हार-भगवतीपूरमध्ये खरेदीसाठी यावे आणि स्थानिक व्यापार वाढावा,” अशी भावना अक्षय मोरे यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे गावातील दुकानदारांना विनामूल्य प्रसिद्धी मिळत असून ग्राहकांना आवश्यक वस्तू पटकन शोधणे सोपे झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळाली आहे.
अक्षय मोरे हे भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष असून राजकारणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. “गावाचा विकास हा गावकऱ्यांच्या सहभागातूनच शक्य आहे. परदेशी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा गावच प्रगतिशील करणे हे माझे ध्येय आहे,” असेही त्यांनी सांगितले.
गावात सुरू झालेला हा उपक्रम इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून लवकरच डिजिटल कोल्हार बाजारपेठ सुरू करण्याचा अक्षय मोरे यांचा संकल्प आहे.
ज्यावेळी गावावर काही प्रसंग येतात किंवा पूर किंवा भूकंप एखादा व्यक्तीला खूप आर्थिक मदत आहे आजारी आहे अशा वेळेस शेतकरी आणि व्यापारी स्थानी हाच खऱ्या अर्थाने मदतीचा हात देत असतो तसेच आपल्या गावातील उत्सव यामध्ये किंवा हरिनाम सप्ताह असू देवीचे मंदिरा असून किंवा गावाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने इथला शेतकरी आणि व्यवसायिक हाच हातभार लावत असतो म्हणून स्थानिक पेठेतूनच खरेदी करावी अशी इच्छा मनाची बाळगलेली आहे
