राहाता शहराच्या विकासाला आणखी चालना; छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास व उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता – डॉ. सुजय विखे पाटील

राहाता | प्रतिनिधी :
राहाता शहरातील व्यापारी सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, राहाता नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास तसेच उर्वरित विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामामुळे व्यापारी संकुलाचे रूपडे बदलण्यास मदत होणार असून, व्यापारी व नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
याबाबत माहिती देताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून राहाता शहराच्या सर्वांगीण विकासाला सातत्याने गती मिळत असून, शहराच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्याने मंजुरी मिळवून दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास व उर्वरित विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता शहरातील विकासकामांना सातत्याने गती मिळत असून, तसेच राहाता नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास व उर्वरित विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
सदर कामांतर्गत व्यापारी संकुलातील आवश्यक दुरुस्ती, नूतनीकरण तसेच प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज व आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच संकुलात येणाऱ्या नागरिकांनाही अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, शहराच्या व्यापारी विकासाला नवी चालना मिळेल.
प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून लवकरात लवकर पुढील कार्यवाहीला गती देण्यात येणार असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या कामामुळे राहाता शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, व्यापारी संकुलाचा विकास शहराच्या आर्थिक व व्यावसायिक प्रगतीलाही बळ देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें